सुस :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेमध्ये प्री- प्रायमरी विभागाच्या अँनुअल स्पोर्ट्स मीट – २४-२५ चा प्रारंभ गुरूवार दि. ५ डिसेंबर रोजी मृदा दिन म्हणजेच माती दिनाचे औचित्य साधून अत्यंत सळसळत्या उत्साहात साजरा झाला. नियोजन बद्ध आखणी आणि त्याबरहुकुम प्रत्येक प्रोग्राम साजरा करण्याची पेरीविंकलच्या सुस शाखेची परंपरा कायम राखली. पालकांच्या उपस्थितीने व खेळात पालकांच्या सक्रीय व उस्फुर्त सहभागाने स्पोर्ट्स डे ची शोभा अजूनच वाढली.
कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वतीपुजन व दीप प्रज्वलनाने करून करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत , पर्यवेक्षक नेहा माळवदे व सचिन खोडके आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून आपले खेळाडू मशाल घेऊन आले व मशाल प्रज्वलित करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय निर्मल पंडीत मॅडम यांना आमंत्रित करण्यात येऊन त्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली.
स्पोर्ट्स मेक्स मॅन रिफ्रेश असे म्हणून सर्वांनी सुद्रुढ व निरोगी राहणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगून अभ्यासा बरोबरच खेळाची जोड तितकीच महत्वाची असते असे सांगून खेळाचे महत्व पटवून देऊन ५ डिसेंबर हा जागतिक माती दिन म्हणून साजरा केला जातो व स्पोर्ट्स म्हणजेच खेळाची नाळ ही मातीशी जोडलेली असते म्हणून पेरीविंकलनी आजच्या दिवशीचे औचीत्य साधून अँन्युवल स्पोर्ट्स मीट चे आयोजन या दिवशी केले आणि सर्वांनी या मातीशी जुळून राहावे असा संदेश शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांनी त्यांच्या भाषणातून सर्व उपस्थित पालक व विद्यार्थीवर्गाला दिला.
एरोबिक डान्स हा शारीरिक व्यायामाचा डान्स प्रकार जो आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे याचे महत्व पेरीविंकलच्या चिमुकल्यांनी त्यांच्या एरोबिक नृत्यातून व रिबन ड्रिल नृत्यातून सादर केले. अत्यंत जोषपूर्ण व सुसूत्रता असणाऱ्या या बहारदार सादरीकरणाने सर्व मान्यवरांनी या चिमुकल्यांचे कौतुक केले.
त्यानंतर या स्पोर्ट्स चा प्रारंभ मुख्याध्यापिका यांच्या हस्ते सर्व पालकवर्गाच्या समवेत फित कापून करण्यात आला.
आजचे युग हे मोबाईल चे युग झाले आहे. आजकाल पालक व पाल्य दोघेही मोबाईलवर व्यस्त असल्याचे आढळून येते त्यामुळे त्यांनी मोबाईल वर बिझी न राहता दोघांनी एकमेकांसोबत हसत खेळत वेळ घालवावा व एकमेकांचा जास्तीत जास्त सहवास होऊन प्रत्येकामध्ये खिलाडूवृत्ती जागृत व्हावी या उद्देशाने पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सुस शाखेने स्पोर्ट्स डे ला पालकांना आमंत्रित करून पालक व पाल्य दोघांनाही खेळात सहभागी करून घेतले. पालकांनी देखील आपल्या पाल्याबरोबर खेळण्यासाठी अत्यंत उस्फुर्तपणे उत्तम असा प्रतिसाद देऊन एक आगळा वेगळा स्पोर्ट्स डे चा आनंद लुटला. हर्डल रेस पार करून आपल्या पालकांकडे सर्व कोन नेऊन पालकांनी आपल्या पाल्याला घेवून परत येणे अशा प्रकारे विविध प्रकारचे खेळ पालकांसमवेत घेण्यात आले. पालक व पाल्य दोघांना एकमेकांसोबत खेळता आले त्यामुळे दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.
विजयी पालक व पाल्य या दोघांनाही ट्रॉफी व मेडल देऊन मुख्याध्यापक व उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पालकांना देखील स्पोर्ट्स डे मध्ये सहभागी करून घेतल्याने एक आगळा वेगळा स्पोर्ट्स डे आज पेरीविंकल शाळेने साजरा केल्याबद्दल सर्व पालकांनी शाळेचे व सर्व शिक्षकांचे आभार मानले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल डायरेक्टर शिवानी बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. पर्यवेक्षिका नेहा माळवदे , सचिन खोडके, क्रीडा शिक्षिका शैला परुळेकर व ज्ञानेश्वर मोरे यांच्या सहकार्याने व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने खेळाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरा झाला. रांगोळी रेखाटन, फलक लेखन, सजावट या कामात सर्वांनीच हातभार लावला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ कल्याणी गोसावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिमा पोळ यांनी केले.
More Stories
बाणेर-बालेवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूनम विधाते यांनी केली पाहणी
महाळुंगे- बालेवाडी येथील “श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलाचे” गुगल मॅप वर ‘छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ असे नाव, कारवाई करण्याची अमोल बालवडकर यांची मागणी…
बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे आणि पाषाण परिसरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनचा ‘मान्सून सेफ्टी ड्राईव्ह 2025’ उपक्रम..