April 30, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर बालेवाडी प्रभाग लोडशेडिंगमुक्त होणार..!बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना यश : समीर चांदेरे

बाणेर :

बाणेर-बालेवाडी, सुस-म्हाळुंगे प्रभागातील बऱ्याच भागात अनियमित वीजपुरवठ्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे बालेवाडी वेल्फेअर परिसरातील सर्व नागरिकांची हि समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील होते.

 

विजेचा हा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी आपल्या भागात २२०/१२ केव्ही सबस्टेशन उभारणे गरजेचे होते. यासाठी मा.चांदेरे साहेबांनी व मी अजितदादांकडे मागणी केली होती, तदनंतर अजितदादा यांच्या सूचनेनंतर मी पुण्याचे विभागीय आयुक्त मा.श्री.डॉ.चंद्रकांतजी पुलकुंडवार साहेब यांची भेट देखील घेतली सबस्टेशनबाबत चर्चा केली, विभागीय आयुक्त श्री.डॉ.चंद्रकांतजी पुलकुंडवार साहेबांनी तात्काळ पुणे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे साहेब यांना सूचना देखील दिल्या होत्या. मला ही आनंदाची बातमी कळताच मी बालेवाडी फेडरेशनच्या सभासदांना देखील कळवली..
– समीर चांदेरे (युवक अध्यक्ष

याची माहिती देताना समीर चांदेरे यांनी सांगितले की,
विजेची ही समस्या सुटावी यासाठी बालेवाडी रेसिडेन्सी सहकारी गृहरचना वेल्फेअर फेडरेशनच्या सभासदांनी काही दिवसांपूर्वी एकत्र येत कोथरुड विधानसभेचे आमदार आणि मंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील,पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुरावजी चांदेरे साहेब ,राहुलदादा बालवडकर आणि मला हि बाब सांगितली. सर्वांनी केलेल्या प्रयत्नाने व बालेवाडी वेल्फेअर असोसिएशनच्या पुढाकाराने हा प्रश्न तातडीने मार्गी लागणार आहे.

मा.अजितदादा, मा.चंद्रकांत दादा, मा.चांदेरे साहेब,राहुलदादा बालवडकर आणि बालेवाडी फेडरेशन व प्रभागातील नागरिक या सर्वांच्या संयुक्तिक प्रयत्नांमुळे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी बालेवाडी मधील सर्व्हे नंबर ४/१ येथे ०.६५ हे.आर जागा २२०/१२ केव्ही सबस्टेशन साठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला असून नव्या सबस्टेशनमुळे आपल्या पूर्ण प्रभागातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याची माहिती समीर चांदेरे यांनी दिली. प्रभागातील सर्व नागरिक आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश असल्याने या सर्वांचे विशेष अभिनंदन.

तसेच सन्माननीय अजितदादा, मा.चंद्रकांतदादा, मा.बाबुरावजी चांदेरे साहेब, बालेवाडी फेडरेशन व प्रभागातील नागरिक, राहुलदादा बालवडकर, विभागीय आयुक्त साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांचे या लोकहिताचा निर्णय घेतल्याबाबत समीर चांदेरे यांनी आभार व्यक्त केले.

You may have missed