कोथरूड :
बाणेर बालेवाडी परिसरामध्ये वाढते गृहनिर्माण प्रकल्प आणि त्यामुळे वाढणारी लोकसंख्या यामुळे दिवसेंदिवस विजेची मागणी प्रचंड वाढल्यामुळे विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये निर्माण झालेल्या तपावतीने वारंवार वीज पुरवठा खंडित होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या वतीने महावितरण कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला.
यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) ने स्वतंत्र २२० केव्ही विद्युत उपकेंद्र मंजूर केले होते व जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. परंतु योग्य जागेअभावी हा प्रकल्प बराच काळ प्रलंबित राहिला होता. बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनने याबाबत पुढाकार घेऊन महापारेषण, महावितरण,जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालय ह्यांच्याशी सतत पाठपुरावा केला. याबाबतीत मा. चंद्रकांत दादा पाटील, आमदार व कॅबिनेट मंत्री यांची जागा मंजूरीसाठी मोलाची मदत झाली आहे. सर्वांच्या प्रयत्नांना शेवटी यश येऊन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे बालेवाडी येथील सर्वे नं. ४/१ ची ०. ६५ हे. जागा महापारेषणला हस्तांतरित करण्याबाबत आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून निघाला.
सबस्टेशनच्या जागेचा प्रश्न सोडविल्या बद्दल फेडरेशनच्या सभासदांनी आज चंद्रकांत दादांची भेट घेऊन त्यांचे हार्दिक आभार मानले.
स्वतंत्र सबस्टेशन झाल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत होऊन बाणेर बालेवाडी करांचा प्रश्न कायमचा सुटेल असा विश्वास याप्रसंगी फेडरेशनतर्फे मोरेश्वर बालवडकर यांनी व्यक्त केला.
यावेळी अशोक नवाल, रमेश रोकडे, मोरेश्वर बालवडकर, आशिष कोटमकर,ॲड. माशाळकर आणि ॲड परशुराम तारे या फेडरेशनच्या सदस्यांनी सदर मंजुरीसाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच यावेळी विकास कामत, शकील सलाटी, अमेय जगताप, सचिन पाषाणकर, अस्मिता करंदीकर उपस्थित होते.



More Stories
ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, सुतारवाडी बस डेपोच्या २४ मीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
महाळुंगे (पाडाळे) येथे “न्यू होम मिनिस्टर” कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! प्रियांका विनायक चिव्हे यांचा उपक्रम..
बालेवाडीत ‘द्वादश मल्हार दर्शन’चा भव्य अध्यात्मिक सोहळा, भारतातील १२ मार्तंड-मल्हार मंदिरांच्या पादुकांचे प्रथमच पुण्यात दर्शन.