May 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाली भाषेच्या नेट परीक्षेत पुण्यातील औंध-बोपोडीच्या लक्ष्मीकांता माने देशात दुसऱ्या

पुणे :

नुकत्याच जाहीर झालेल्या नेट परीक्षेच्या निकालात लक्ष्मीकांता माने यांनी पाली भाषेत, नेट परीक्षेत देशात सर्वसाधारण गटात दुसरा, तर एससीमध्ये देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

पाली भाषा अभिजात भाषा जाहीर झाली असतानाच, या भाषेत लक्ष्मीकांता यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. माने या कंटेन्ट कंन्सेप्ट कम्युनिकेशन या संस्थेच्या संचालिका आहेत. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील जनसंपर्कामध्ये त्यांचे विशेष काम आहे. ज्येष्ठ पत्रकार सुनील माने यांच्या त्या पत्नी आहेत.

या यशात त्यांना मार्गदर्शन करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली विभागाचे विभागप्रमुख प्रो.डॉ.महेश देवकर यांचा बहुमोल वाटा आहे. येत्या काळात पालीच्या प्रचार प्रसारासाठी उल्लेखनीय काम करण्याचा लक्ष्मीकांता माने यांचा मानस आहे.

 

कोविडच्या काळापासून लक्ष्मीकांता यांनी एमएस्सी (मीडिया स्टडिज), सेट (मीडिया ॲंड कम्युनिकेशन्स), लोअर ॲंड हायर डिप्लोमा इन पाली, एमए (पाली-सुवर्णपदकासह), आणि आता नेट या पदव्या संपादन केल्या. याआधी बीटेक (कॅास्मॅटॅालॅाजी), पदव्युत्तर पदविका (मार्केटिंग ॲंड सेल्स मॅनेजमेंट सुवर्णपदकासह), मास कम्सुनिकेशन्समध्ये पदवी अशा पदव्या संपादन केल्या आहेत.