बाणेर :
बाणेर गावातील दत्तनगर, विधाते वस्ती येथील रस्त्याचे डांबरीकरण स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नातून पुर्ण झाले. काम सुरू असताना कामाचा दर्जा उत्तम असावा म्हणून युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी परिसरातील नागरिकांसह उपस्थित राहून काम पूर्ण करून घेतले.
गेल्या अनेक दिवसांपासून दत्तनगर विधाते वस्ती परिसरातील नागरिकांनी रस्त्याचे डांबरीकरण व्हावे म्हणून चांदेरे यांच्या कडे मागणी केली होती. नागरिकांची अडचण पाहून ती दूर करण्याचा शब्द दिल्यानंतर सदर रस्त्याचे काम पूर्ण करून घेत दिलेला शब्द पाळला.
चांदेरे साहेबांची कामाची पद्धत वेगळी असते. जेंव्हा नागरिक समस्या घेऊन येतात तेंव्हा ती समस्या लवकरात लवकर कशी सोडविली जाईल याकरिता ते स्वतः लक्ष घालतात. आपल्या प्रभागातील अडचणी मार्गी लागव्या याकरिता नियोजन करतात. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लागतात याचे समाधान वाटते.
– समीर चांदेरे (युवक अध्यक्ष)



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी