कोथरुड :
श्री खंडेराय प्रतिष्ठान बालेवाडी पुणे 45 या संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष मा. गणपतराव तथा आप्पासाहेब बालवडकर यांचा शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल” भारत सन्मान” हा पुरस्कार इंडियन हेरिटेज आणि हेल्थ केअर सेंटर यांच्यावतीने नवी दिल्ली येथे इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे जस्टीस मनमोहन सिंग ,भारताचे माजी परराष्ट्रमंत्री व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद , आयकर महासंचालक नासिर अली, तसेच आय.आर. एस. श्री नय्यर अली नझमी यांच्या प्रमुख उपस्थित प्रदान करण्यात आला.
हेच औचित्य साधून राजा श्री शिवराय प्रतिष्ठान संस्था कोथरूड पुणे या संस्थेच्या वतीने मा. गणपतराव तथा आप्पासाहेब बालवडकर यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. सागर बालवडकर यांचेही अभिनंदन व सन्मान करण्यात आला.
मा.कृषिमंत्री शशिकांत भाऊ सुतार साहेब यांच्या शुभहस्ते आप्पासाहेबांचा सन्मान करण्यात आला तसेच श्री खंडेराय प्रतिष्ठान संस्थेची धुरा उत्तम आणि समर्थपणे सांभाळत असल्यामुळे राजा श्री शिवराय प्रतिष्ठान संस्थेचे सचिव मा. किसनराव बांदल यांच्या शुभहस्ते डॉ.सागर बालवडकर यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी श्री म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दत्तात्रय डफळ यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राजा श्री शिवराय प्रतिष्ठान संस्थेतील अनेक मान्यवर संचालक ,पदाधिकारी , प्राचार्य आणि अध्यापक वृंद उपस्थित होते.
आभार प्रदर्शन मा. मुख्याध्यापिका संध्याताई देशपांडे यांनी मानले तर पाहुण्यांचा परिचय डॉ .शांताराम डफळ तर सूत्रसंचालन अजित वाराणसीवार यांनी केले. तसेच न्यू इंडिया स्कूलच्या प्रिन्सिपल पूर्वा मॅडम यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..