सुस:
सुस गावच्या दसरा सणाची परंपरा आजही जपली जाते. सायंकाळी ५ः३० वा. सर्व गावकरी भैरवनाथ मंदिरासमोर जमतात. सिमोल्लंघनाची तयारी केली जाते. नाथसाहेबांच्या नावानं चांगभलं म्हणून हाळी देत म्हणून भैरवनाथ मंदीरापासुन सर्वजण निघतात. संबळं वाजवत पुढे भराडी मंडळी मागे गावकरी गावाच्या पूर्व दिशेला ही मिरवणूक जाते. तिथे शमीच्या झाडाचं पूजन केलं जातं, श्रीफळ वाढवतात आरती होते. मग सोनं लुटण्याचा कार्यक्रम होतो. पूर्वी सुस बाणेर शिवेवर हा कार्यक्रम व्हायचा असं जुनी माणसं सांगायची. आता काळानुरूप त्यात बदल होऊन ठिकाण अलीकडे घेतलं आहे. तिथुन लक्ष्मीमाता मंदीरात सोनं वाहीलं जातं.
नंतर पुन्हा भैरवनाथ मंदीरात येतात. आरती होते, देवाला सोनं वाहीलं जातं, मग मंदीरासमोर सर्व गावकरी एकमेकांना सोनं देतात. इथं मतभेदाला थारा नसतो. वर्षभरात झालेले वादविवाद विसरले जातात. सर्वजण आनंदाने एकमेकांना अलिंगन देत गळा भेट घेत सोन्याची देवाण घेवाण करतात. लहान मोठ्यांच्या पाया पडतात. मोठी माणसं लहानांना आशिर्वाद देतात. अतिशय आनंदात हा सोहळा साजरा होतो. बाकी माहीत नाही परंतू आनंद लुटण्यासाठी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मात्र हा नक्कीच आहे. त्यासाठीच तर म्हणतात ‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा !’
हा कार्यक्रम साधारण दिड दोन तास चालतो. नंतर सर्वजण गावात घरोघरी सोनं देत एकमेकांना भेटतात. जेवणं उरकुन रात्री ९ वाजता श्री भैरवनाथांची पालखी निघते. पालखी मंदिरात आल्यावर दसरा सणाची सांगता होते.
मतभेद विसरून सर्वजण आनंदाने एकत्र येत असल्यानेच दसरा सण मला खूप मनापासून आवडतो. म्हणूनच इतर सर्व कार्यक्रम बाजूला सारून आवर्जुन ‘दसरा’ सणात पुढे होऊन मी सहभागी होतो.
– श्री सुनील चांदेरे(उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्या. पुणे.)
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..