November 21, 2024

Samrajya Ladha

विलोज सोसायटीच्या सोलर प्रकल्पाचे उद्घाटन

बालेवाडी :

बालेवाडीतील विलोज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने आपला ७० किलोवाॅट क्षमतेचा सोलर प्रकल्प दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कार्यान्वित केला. महावितरणचे ॲडिशनल एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर श्री. पंडीत दांडगे यांच्या शुभहस्ते या १२९ सोलर माॅड्यूल्स व ३ इन्व्हर्टरसह उभारलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. महावितरणचे असिस्टंट इंजिनिअर श्री. सोमनाथ पटाडे हे सुद्धा समारंभास उपस्थित होते.

हा प्रकल्प वर्षाला एक लाखाहून अधिक विद्युत युनिटस् निर्माण करताना सोसायटीच्या विजबिलात १५ लाखांहून अधिक रुपयांची बचत करेल. उद्घाटन समारंभात बोलताना श्री. दांडगे यांनी सोसायटीच्या सोलर उपक्रमांची प्रशंसा केली. पंतप्रधानांच्या सौर्यउर्जा वापरास चालना देण्याच्या आवाहनाला सोसायटीने उत्तम प्रतिसाद दिल्याचे त्यांनी नमूद केले.

विलोज सोसायटीचा हा दुसरा सोलर प्रकल्प आहे. यापूर्वी २०२२ साली सोसायटीने ४० किलोवाॅटचा सोलर प्रकल्प कार्यान्वित केला. हे दोन प्रकल्प मिळून वर्षाला १,६०,००० विद्युत युनिटस् निर्माण करतील.