पुणे विद्यापीठ :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ऐतिहासिक पथ संचलन केले. भारत माता की जय आणि वंदे मातरमने परिसर दुमदुमला.
पुणे विद्यापीठाच्या विविध केंद्रांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी स्वयंसेवक सहभागी झाले होते.
विजयादशमीच्या दिवशी, १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. संघाच्या स्थापनेला या वर्षी 99 वर्षे पूर्ण झाली असून, शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. या उपलक्ष्यात संघाच्या स्वयंसेवकांनी रविवारी दुपारी 4 वाजता विद्यापीठ कॅम्पसमध्ये पथ संचलनाचे आयोजन केले. पूर्ण गणवेशात घोषच्या धुनवर राष्ट्रभक्तीचे गीत गात, स्वयंसेवकांनी संपूर्ण विद्यापीठ परिसराची परिक्रमा केली.
संचलनादरम्यान विद्यापीठ भाग संघचालक श्री. सूभाष कदम, प्रांत महाविद्यालयीन प्रमुख श्री. सचिन काळे, महानगर प्रचारक श्री. केदार कुलकर्णी, अधिसभा सदस्य श्री. शंतनु लमधाडे आणि श्री. कृष्णाजी भंडल उपस्थित होते. तसेच भारतीय कामगार संघटनेचे श्री. शिवाजी अण्णा उत्तेकर उपस्थित होते.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!