बाणेर :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने आज कोथरुड विधानसभा मतदारसंघ प्रभाग निहाय पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक ९ बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे भागाकरिता विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. तसे नियुक्ती पत्र शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.
पक्षाची संघटनात्मक शक्ती वाढवून पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या. नियुक्त करण्यात आलेले सर्वच पदाधिकारी अतिशय जोमाने पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न करतील असा विश्वास वाटतो. सर्व पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा !!!
– जयेश मुरकुटे
कार्याध्यक्ष, कोथरूड विधानसभा,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप, कोथरुड विधानसभेचे अध्यक्ष स्वप्निल दादा दुधाने, योगेश सुतार, शैलेंद्र कदम, किशोर कांबळे इ. उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ९ नूतन कार्यकारणी :
१) सारंग कोळेकर – प्रभाग अध्यक्ष
२) आनंद पडले – प्रभाग कार्याध्यक्ष
३) सिद्धांत माने – प्रभाग कार्याध्यक्ष
४) हर्षद जाधव – प्रभाग उपाध्यक्ष
५) विनोद सोनवणे – प्रभाग सरचिटणीस
६) रोहन जगताप – प्रभाग चिटणीस


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!