May 24, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध आय टी आय चे नामकरण “छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था, औंध, पुणे, असे झाले.

औंध :

शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे चे आज राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते आभासी ( ऑनलाईन) पद्दतीने “छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे” असा नामकरण सोहळा पार पडला.

यावेळी प्रत्यक्ष औंध आय टी आय मध्ये स्थानिक नगरसेविका मा सौ अर्चनाताई मुसळे, अड मधुकर मुसळे, मा श्री राहुल दादा बालवडकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर , पुणे विभागाचे सहसंचालक रमाकांत भावसार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यालय अधिक्षक सुभाष जाधव,संघटनेचे विभागीय खजिनदार संजय भोर,गट निदेशक,शिल्पनिदेशक आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

“छत्रपती शिवाजी महाराज यांना संपूर्ण जगात मानसन्मान आहे, आणि त्यांचे नाव आपल्या संस्थेला महाराष्ट्र शासनाने दिले आहे. हा पुणेकरांचा गौरव आहे “असे मत ॲड. मधुकर मुसळे यांनी व्यक्त केले.

 

“औंध आय टी आयचे नाव देशात अग्रस्थानी आहेच आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्याने लौकिकात भर पडले आहे, हा लौकिक टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे ” असे मत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांनी नमूद केले.

यानंतर सहसंचालक रमाकांत भावसार यांनी नामकरणाची पार्श्वभूमी सांगुन संस्थेचे छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे असे नामकरण केल्या बद्दल शासनाचे आभार मानताना उपस्थितांना शुभेच्छा हि दिल्या.

“प्रशिक्षणार्थीने शिवाजी महाराजांना आदर्श मानुन औंध आय टी आय चे नाव रोशन करावे ” असे सांगताना माजी नगरसेविका अर्चना मुसळे यांनी प्रशिक्षणार्थींना व्यसना पासून दूर रहाणे बाबत आव्हान देखील केले.

कार्यक्रमाची रूपरेषा आणि प्रस्ताविक उपप्राचार्य अशोक साबळे यांनी केले. तर सुत्रसंचालन – सौ प्रियंका वाघमारे आणि श्री कमलेश पवार यांनी केले.

कार्यक्रमाची व्यवस्था राहुल पायगुडे, सुनील तुपलोंढे, सुधीर खेडकर, गणेश भुजबळ, श्रीकांत मुरटे, के जी जाधव, सौ. कळमकर, सौ. तारडे, सौ. छाडीकर यांनी केली.