April 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

योगीराज पतसंस्थेला पतसंस्था फेडरेशनचा “आदर्श पतसंस्था” पुरस्कार ….

पुणे :

पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन च्या वतीने सन 2024 चा “आदर्श पतसंस्था” पुरस्कार बाणेर येथील योगीराज पतसंस्थेला प्रदान करण्यात आला. सदरचा पुरस्कार योगीराज पतसंस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे यांनी पतसंस्था फेडरेशनचे सेक्रेटरी शहाजी रानवडे, मानद सचिव शामराव हुलावळे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांच्या हस्ते स्विकारला.

ज्या पतसंस्थेच्या ठेवी 100 कोटी रुपयांच्या पुढे आहेत अशा संस्थांच्या मधून उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल योगीराज पतसंस्थेला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, संस्थेला मिळालेला पुरस्कार हा संस्थेला मिळालेले खातेदार, संचालक व स्टाफ यांच्यामुळेच मिळालेला आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष गणपत मुरकुटे,पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव, गणेश मुरकुटे, प्रणव मुरकुटे व इतर उपस्थित होते.

 

You may have missed