May 26, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील समर्थ रेसिडेन्सी आणि श्री हौसिंग सोसायटी अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण बाबुराव चांदेरे, राहुल बालवडकर, समीर चांदेरे यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण….

बालेवाडी :

बालेवाडी येथील समर्थ रेसिडेन्सी आणि श्री हौसिंग सोसायटी मधील १० वर्षांपासून दुरावस्था झालेल्या अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाले.

 

बालेवाडी येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ असणाऱ्या समर्थ रेसिडेन्सी आणि श्री हौसिंग सोसायटी या दोन्ही सोसायट्यांचे अंतर्गत गेली दहा वर्षे रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्याने खूप मोठी अडचण या सोसायट्यांची दूर झाली आहे.

आमच्या सोसायटी मधील नागरीकांना खराब रस्त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. पावसाच्या पाण्यामुळे अंतर्गत रस्ता जास्तच खराब झाला होता लहान मुलांना, ज्येष्ठांना फिरणे मुश्किल झाले होते. नागरिकांची हि अडचण लक्षात येताच माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांनी पाठपुरावा करत अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करून दिले. आम्हा आम्हा सोसायटी धारकांची फार मोठी समस्या सोडविल्याबद्दल आम्हीं सर्व नागरीक खूप आभारी आहोत
– सतीश भिसे
प्रसाद जोशी
(सोसायटी धारक नागरीक)