November 4, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथील विधाते वस्ती रोडवरील फुटपाथवर साठलेल्या कचऱ्याचा प्रश्न जयेश मुरकुटे यांच्या प्रयत्नामुळे मार्गी…

बाणेर :

बाणेर येथील विधाते वस्ती रोडवरील फुटपाथवर वरील कचरा जयेश मुरकुटे यांनी औंध क्षेत्रीय कार्यालयाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे काढण्यात आला व साफसफाई करण्यात आली.

फुटपाथ वरती पडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच रस्ता देखिल अस्वच्छ झाला होता. हे लक्षात येताच औंध क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन कचरा उचलून साफसफाई करण्याची मागणी व पाठपुरावा करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कचरा उचलून साफसफाई करत नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न मार्गी लागला
– जयेश मुरकुटे
कार्याध्यक्ष, कोथरूड विधानसभा,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)

You may have missed