July 20, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वरवाडी येथे नवरात्रोत्सव निमित्त सचिन दळवी सोशल फाउंडेशन आयोजित ‘ग्रुप दांडिया व गरबा महोत्सव’मध्ये महिलांचा सन्मान राखला जावा म्हणून जनजागृती…

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी येथे नवरात्रोत्सव निमित्त सचिन दळवी सोशल फाउंडेशन व श्री दुर्गामाता नवरात्रोत्सव यांच्या वतीने आयोजीत ‘ग्रुप दांडिया व गरबा महोत्सव’ ला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत दांडीया आणि गरब्याचा आनंद उपभोगला.

सोमेश्वरवाडी आणि परिसरातील नागरिकांनी नवरात्री उत्सवाचा आनंद उपभोगत दांडीया व गरबा ला टाळ्यांच्या गजरात दाद दिली. यावेळी विविध प्रकारचे नावाजलेले ग्रुपनी दांडीया व गरबा खेळत उपस्थितांची वाहवा मिळविली.

नवरात्रोत्सव निमित्त आयोजित दांडीया, गरबा याच्यातून महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचे काम केले गेले. महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे हा संदेश दिला गेला. सचिन दळवी यांनी सतत विविध प्रकारच्या उपक्रमातून नागरिकांसाठी काम केले आहे याचे कौतुक वाटते. अशाच प्रकारे विविध प्रकारच्या उपक्रमातून नागरिकांसाठी कार्यरत राहत राजकीय वाटचाल सुरू ठेवावी यासाठी माझ्या शुभेच्छा – नामदार चंद्रकांत पाटील (उच्च तंत्र शिक्षण मंत्री)

यावेळी गणेशोत्सवानिमित्त व सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातील विजेत्यांना हेलिकॉप्टर राईड काही तांत्रिक कारणास्तव रद्द झाल्यामुळे सायकल आणि एक्वागार्ड भेट देण्यात आले.