पौड :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या पौड शाखेमधील पेरीविंकल शाळेत विदयार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्या समवेत रंगला दांडीया व रासगरबा. दांडिया व गरबाची रास पौड मधील पेरीविंकलच्या पालकांसाठी खास. शारदीय नवरात्रीच्या उत्साहामध्ये दांडीया, भोंडला व रासगरबा पेरीविंकल च्या पौड शाखेमध्ये संपन्न.
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पौड शाखेमध्ये आज मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्रीचे औचित्य साधून त्या निमित्त दांडीया व रासगरबा चे आयोजन पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या पौड शाखेत कऱण्यात आले होते. विध्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ या सर्वांचा यात सहभाग होता. शाळेच्या परिसरात गरबाच्या तालावर समस्त गावकरी व विद्यार्थी यांनी ठेका धरला. पालक व ग्रामस्थांनी गरबा व दांडीया खेळण्यासाठी प्रचंड उत्साहात प्रतिसाद दिला.
पेरिविंकल शाळा ही मुळशी तालुक्यात नावाजलेली इंग्लिश मिडीयम स्कूल असून अभ्यासाबरोबरच संस्कृती चा ठेवा असणारी संस्कृती व संस्कार जोपासण्याचा अविरत प्रयत्न करणारी शाळा म्हणून तिचा नावलौकिक आहे.
मंगळवारी 8 ऑक्टोबर रोजी या गरबा व रास दांडियाचे आयोजन शाळेच्या आवारात करण्यात आले होते. गरबा व दांडीया ड्रेस चा पेहराव करुन सर्व शिक्षकवर्ग व पालकगण व विध्यार्थी यात सहभागी झाले होते.
या गरबा व रास दांडीया सोहळ्याचा आरंभ शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ रेखा बांदल शाळेच्या तरुण तडफदार डायरेक्टर शिवानी बांदल यांच्या समवेत मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात करण्यात आला. या गरबा दांडीया सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी लावलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल. शाळेच्या काही विद्यार्थ्यांनी फूड स्टॉल म्हणजेच खाद्यपदार्थ याचे आयोजन केले होते. सँडविच, फ्रुटी, लिंबू सरबत, ओली व सुकी भेळ अशा विविध स्टॉल ला गरबा खेळून सर्वांनी भेट देउन सर्व खाद्यपदार्थांचा देखील मनमुराद आनंद लुटला.
या संपूर्ण भोंडला, गरबा व दांडीया सोहळ्याचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल व शिवानी बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पेरिविंकल शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या नेतृत्वाने करण्यात आले होते . पर्यवेक्षक प्राजक्ता वाघवले यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थीवर्ग यांच्या मदतीने आजचा हा गरबा दांडीया सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. सर्वांनी यात गरबा व दांडीयानृत्याचा मनमुराद आनंद घेतला. गरबा व दांडीया मध्ये सामील होऊन खरोखर शारदीय नवरात्र अनुभवून नवरात्रीच्या नऊ देवींचा जागर करत आदिशक्ती चा प्रत्यक्ष अनुभव आल्यासारखे वाटले.
वन्दे मातरम् या गीतावर गरबा नृत्याचा ठेका धरत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी इत्ते व सुषमा दातीर यांनी केले होते.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..