म्हाळुंगे :
म्हाळुंगे येथे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नातून पुराणिक सोसायटी ते कीर्ती सोसायटी पर्यंत २ कोटी २५ लक्ष रुपयांच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर म्हाळूंगे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा.चांदेरे साहेब सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्याच अनुषंगाने म्हाळुंगे परिसरातील ड्रेनेज लाईन चे काम मार्गी लागावे यासाठी नागरिकांची मागणी होती. म्हणून चांदेरे यांनी नागरिकांची अडचण दूर व्हावी म्हणुन पालिका प्रशासनाचा पाठपुरावा करत ड्रेनेज प्रश्न मार्गी लागणार आहे.
यावेळी माणिक गांधीले, संजय ताम्हाणे, अजिंक्य निकाळजे आणि परिसरातील नागरिक व स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते.




More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!