October 23, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी येथे राहुल दादा बालवडकर आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित भव्य दांडिया उत्सवामध्ये विजेत्यांनी जिंकल्या चांदीच्या दांडिया..

बालेवाडी :

बालेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित भव्य दांडिया उत्सवाचे उद्घाटन मा.श्री समीर भाऊ चांदेरे (शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी) व राष्ट्रवादी महिला यांच्या शुभहस्ते आणि बक्षिस वितरण मा.स्थायी समिती अध्यक्ष श्री.बाबूरावजी चांदेरे साहेब, मा.श्री.सुनीलजी फुलारे साहेब (IG) मा.सौ.श्रेयाजी बुगडे सिनेअभिनित्री, मा.सौ.पुजा सावंत सिनेअभिनित्री, .मा.सौ.प्रार्थना बेहेरे सिनेअभिनित्री यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

माझे मार्गदर्शक मा.स्थायी समिती अध्यक्ष बाबूरावजी चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना प्रभागातील नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी नवरात्रोत्सवानिमित्त महिलांनी दैनंदिन कामकाजाच्या व्यापातून वेळ काढत आपल्या कुटुंबा सोबत, मित्र मैत्रिणीं सोबत एकत्रित येऊन दांडिया उत्सवाचा आनंद लुटावा म्हणून हे व्यासपीठ उपलब्ध केले आहे. महिलांचा आणि नागरिकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून आमचा देखिल उत्साह द्विगुणित झाला. पुढे देखील विविध कार्यक्रम नागरिकांसाठी घेतले जातील : राहुल दादा बालवडकर (उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)

गरबा दांडिया खेळत रोज खूप सारी बक्षिसे जिंकण्याची संधी या दांडिया उत्सवात नागरिकांना मिळाली व रोज तिन लकी ड्रॉ काढण्यात येत आहे. विजेत्यांना चांदीच्या दांडिया बक्षिस देण्यात आल्या.

बक्षिस वितरण समारंभ वेळी युवक अध्यक्ष समीरभाऊ चांदेरे, नितीन कळमकर, मनोज बालवडकर पाटील, चेतन बालवडकर आदि मान्यवर उपस्थित होते.

भव्य दांडिया उत्सवाचे तिन दिवसाचे विजेते :
पहिला दिवस
1. सर्वोत्तम बाल डान्सर – माहिरा कुलकर्णी
2. सर्वोत्तम जेष्ठ नागरिक डान्सर – सुनंदा जमदाडे
3. सर्वोत्तम जोडीदार डान्सर – रेणुका दिपक धोबळे
4. सर्वोत्तम महिला डान्सर – आराध्या कदम
5. सर्वोत्तम पुरुष डान्सर – अमित वंधारे
6. सर्वोत्तम ग्रुप डान्सर – बिंधास गर्ल्स , जार्डिन सोसायटी-म्हाळुंगे.

दुसरा दिवस
1. सर्वोत्तम बाल डान्सर – वंदना राकेश कुशाबा
2. सर्वोत्तम जेष्ठ नागरिक डान्सर – आशाताई वव्हाले
3. सर्वोत्तम जोडीदार डान्सर – आदेश अडगुरवार आणि रुचिका ईश्वरकर
4. सर्वोत्तम महिला डान्सर – प्राची पाटीदार
5. सर्वोत्तम पुरुष डान्सर – प्रणव देसाई
6. सर्वोत्तम ग्रुप डान्सर – ओरवी एंजल्स,बालेवाडी
7. सर्वोत्तम जोडी – पुजा चव्हाण आणि माधुरी आडोदे

तिसरा दिवस
1. सर्वोत्तम बाल डान्सर – असिद्धि राठोड
2. सर्वोत्तम जेष्ठ नागरिक डान्सर – तुळसा कदम
3. सर्वोत्तम जोडीदार डान्सर – सिमरन सिंग आणि विनीत शेरॉय
4. सर्वोत्तम महिला डान्सर – प्रिशा काकडे
5. सर्वोत्तम पुरुष डान्सर – साई राऊत
6. सर्वोत्तम ग्रुप डान्सर – अंबर सोसायटी,बाणेर