February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर मध्ये “भव्य दांडिया नाईट,बाणेर” कार्यक्रमासाठी जबरदस्त उत्स्फूर्त प्रतिसाद!!

बाणेर :

“भव्य दांडिया नाईट, बाणेर” कार्यक्रमाचे माननीय ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी व फुलवंती चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. मा ना चंद्रकांत दादा यांनी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना आगामी चित्रपट “फुलवंती” साठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे या दांडिया कार्यक्रमात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने आले होते, दोन्ही दिवसांत मिळून ७००० ते ८००० नागरिकांनी दांडिया साठी उपस्थिती लावली.

सहभागी नागरिकांसाठी लकी ड्रॉ द्वारे भरघोस बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी काही प्रतिथयश दांडिया डान्स ग्रुप बोलावले होते. त्यांचेही सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
दोन्ही दिवशी उत्कृष्ट बाल, महिला, पुरुष डान्सर आणि उत्कृष्ट जोडी, उत्कृष्ट वेशभूषा यांनाही ट्रॉफी आणि भरघोस बक्षीस देण्यात आले.

बक्षीसांमध्ये LED टीव्ही,फ्रिज, सायकल, इस्त्री, डिनर सेट, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रिक टोस्टर, हॉट वॉटर केटल, ब्लू टूथ स्पीकर, म्युझिक सिस्टिम, मिक्सर , डिझायनर साड्या आदी बक्षीसांची खैरात करण्यात आली. बक्षीस वितरण भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री राजेश पांडे व सौ सरोज ताई पांडे यांच्या हस्ते देण्यात आली.

सर्व नागरिकांनी माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा नेत्या सौ कल्याणी टोकेकर, सौ निकिता माताडे, सौ वैशाली कमाजदार, जागृती विचारे,श्री प्रवीण आमले, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, मा नगरसेविका स्वप्नाली सायकर, कार्यक्रमाचे आयोजन श्रीनाथ सोशल फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी कोथरूड उत्तर मंडल यांच्यावतीने करण्यात आले.