जयेश मुरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते संपन्न..
बाणेर :
बाणेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद चंद्र पवार) कोथरुड विधानसभा मतदासंघातील कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
एक आश्वासक चेहरा म्हणून जयेश मुरकुटे यांचा चेहरा बाणेर परीसरात उभा असून नागरीकांच्या अडचणी सोडविण्यासाठी हक्काचे ठिकाण देण्यासाठी जनसंपर्क कार्यालय त्यांनी उभे केले आहे. पक्षाच्या वतीने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी एक तरुण तडपदार नेतृत्व बाणेर परिसरात उभारून आले आहे. आपली प्रतिमा जनसामान्यांमुळे तयार होते. त्यामुळे जनसामान्यात मिसळून त्यांची सेवा करा आयुष्यात मोठे व्हाल : खासदार सुप्रिया सुळे
नागरिकांच्या हक्काचे ठिकाण म्हणून हे जनसंपर्क कार्यालय दररोज कार्यरत राहील. नागरिकांनी हक्काने या ठिकाणी यावे व आपल्या घरातलाच माणूस समजून आम्हास समस्या सांगाव्यात आम्ही सर्वतोपरी त्या समस्या सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करू – जयेश संजय मुरकुटे (कोथरूड मतदारसंघ कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप महिला शहर अध्यक्ष स्वाती पोकळे, स्वप्नील दुधाने, अभिनव शिक्षक प्रसारक मंडळाचे अशोक मुरकुटे, माजी नगरसेविका रंजनाताई मुरकुटे, रवीकांत वर्पे, गणपत मुरकुटे, राजेश विधाते, भैरवनाथ शिक्षण संस्थेचे खजिनदार राहुल धनकुडे , अमर लोंढे, गणेश तापकीर, भगवान तात्या मुरकुटे, भानुदास मुरकुटे, हरिभाऊ धनकुडे, सुधाकर धनकुडे, प्रल्हाद मुरकुटे, महेश सुतार, योगेश सुतार, बबनराव दांगट, जनार्धन मुरकुटे, गणेश विधाते, राजेंद्र मुरकुटे, गणेश मुरकुटे, बबलू मुरकुटे , अजय निम्हण, अंकुश पाडाळे, नारायण चांदेरे, बजरंग चांदेकर, बन्सीअण्णा मुरकुटे, अर्जुन सागर मुरकुटे , राजेंद्र ताम्हाणे, ॲड. आशिष ताम्हाणे, सुनिल कडूसकर, नवनाथ मुरकुटे तसेच परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..