पिरंगुट :
बुधवार दिनांक 21 /8 2024 रोजी झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या पिरंगुट शाखेच्या इयत्ता दहावीचा विद्यार्थी शिवम महाले याने सतरा वर्षीय वयोगटात सुवर्णपदक पटकावले. 17 वर्षीय वयोगटात हर्षदा बलकवडे या विद्यार्थिनींनीही सुवर्णपदक पटकावले.
भरे संकुल मध्ये झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत एकूण 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यात शिवम आणि हर्षदा हे दोघे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. यांना मिळालेले पदक म्हणजे संस्थेसाठी मेहनतीची मिळालेली थाप आहे.
माननीय अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर यांनी शुभेच्छा देत या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या संचालिका रेखा बांदल व मुख्याध्यापक डॉ. अभिजीत टकले सर यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन करत कौतुकाची थाप दिली. क्रीडा क्षेत्रामध्ये पेरिविंकल स्कूलने मारलेली भरारी ही नक्कीच उत्तुंग आहे.



More Stories
पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे – ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा