May 8, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

क्रिडा क्षेत्रातही पेरिविंकलच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

बावधन:

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या बावधन शाखेतून बुधवार दिनांक २१/ ८/२०२४ रोजी मुळशी क्रीडा संकुल भरे येथे झालेल्या तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या बावधन शाखेचा इयत्ता दहावीचा सार्थक चोंदे याने १७ वर्षीय वयोगटात ६५ किलो वजन गटामध्ये रौप्य पदक म्हणजेच सिल्वर मेडल पटकावले.

भरे संकुल मध्ये झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत एकूण २५० च्या वर विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यात सार्थक याने पटकावलेले रौप्य पदक खरोखरच कौतुकाची व मेहनतीची मिळालेली थाप आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल यांनी केले व शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सज्ज होण्यास प्रोत्साहित केले. तसेच संचालिका सौ रेखा बांदल व मुख्याध्यापिका प्रिया लढ्ढा यांनी त्याचे मनापासून अभिनंदन करत कौतुकाची थाप दिली.

पेरिविंकल स्कूल सर्वच क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवतात हे यावरून सिद्ध होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर संचालिका रेखा बांदल तसेच मुख्याध्यापिका सौ प्रिया लढ्ढा यांचे नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन असते त्यामुळेच पेरिविंकल चे हिरे चमकतात असे शिक्षवृंद व पालकांनी नमूद केले.

या संपूर्ण विजयाचे व रौप्य पदक प्राप्तीचे श्रेय हे सार्थक च्या मेहनतीला व त्याचे शाळेतील क्रीडा शिक्षक ज्यांनी त्याला भाग घेण्यास प्रोत्साहित करुन खेळासाठी भरे येथे स्वतः घेऊन गेले असे सुरज साठे सर, पर्यवेक्षक इंदू पाटील, कल्याणी शेळके व पालक आणि वर्गशिक्षक या सर्वांना जाते असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रिया लढ्ढा यांनी अभिनंदन करताना सांगितले.

सहभागी विद्यार्थी व उपस्थित मान्यवर. विद्याध्यांना शुभेच्छा दिल्या.

 

You may have missed