सुस :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सूस शाखेतून इयत्ता बुधवार दिनांक २१/ ८//२०२४ रोजी मुळशी क्रीडा संकुल भरे येथे झालेल्या तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सुस शाखेचा इयत्ता दहावीचा हर्शवर्धन पडाळे याने १७ वर्षीय वयोगटात ९२ किलो वजन गटामध्ये रौप्य पदक म्हणजेच सिल्वर मेडल पटकावले.
भरे संकुल मध्ये झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत एकूण २५० च्या वर विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यात हर्षवर्धन याने पटकावलेले रौप्य पदक खरोखरच कौतुकाची व मेहनतीची मिळालेली थाप आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल यांनी केले व शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सज्ज होण्यास प्रोत्साहित केले. तसेच संचालिका सौ रेखा बांदल व मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांनी त्याचे मनापासून अभिनंदन करत कौतुकाची थाप दिली.
पेरिविंकल स्कूल सर्वच क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवतात हे यावरून सिद्ध होते . संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर संचालिका रेखा बांदल तसेच मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांचे नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन असते त्यामुळेच पेरिविंकल चे हिरे चमकतात असे शिक्षवृंद व पालकांनी नमूद केले.
या संपूर्ण विजयाचे व रौप्य पदक प्राप्तीचे श्रेय हे हर्षवर्धन च्या मेहनतीला व त्याचे शाळेतील क्रीडा शिक्षक ज्यांनी त्याला भाग घेण्यास प्रोत्साहित करुन खेळासाठी भरे येथे स्वतः घेऊन गेले असे ज्ञानेश्वर मोरे सर, HOD सचिन सर , नेहा माळवदे व पालक आणि वर्गशिक्षक या सर्वांना जाते असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी अभिनंदन करताना सांगितले.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन