July 15, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाण येथे प्रमोद निम्हण यांच्या जनसंपर्क कार्यालयात फॉर्म भरून हजारो महिलांनी घेतला ‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ..

पाषाण :

पाषाण येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्या जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण’ योजनेसाठी आवश्यक फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत पाषाण परिसरातील जवळपास १५०० पेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा फॉर्म भरून घेतला आहे. फॉर्म भरून दिलेल्या बहुतांशी महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

पाषाण परिसरात महिलांना फॉर्म भरण्यासाठी अडचण येऊ नये व व्यवस्थित फॉर्म भरून येणाऱ्या प्रत्येक महिला भगिनींना ‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ घेता यावा म्हणून माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्या वतीने प्रयत्न केला जात आहे.

याबद्दल माहिती देताना माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांनी सांगितले की, राज्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्याकरीता अर्थसंकल्पात राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेला माता-भागिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आजपर्यंत १ कोटी ३ लाख रुपये माता-भागिनींच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे मिळून ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहे.  या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान, हसू दिसून येत आहे. रक्षाबंधन सणानिमित्ताने ओवाळणी म्हणून भेट दिली आहे. ज्या महिला भगिनींनी अजून फॉर्म भरले नाही त्यांनी माझ्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा त्यासाठी लागणारी सर्व मदत केली जाईल.