गणेशखिंड :
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या विद्यार्थी तसेच शिक्षकांनी दिव्यांगासाठी काम करणार्या बाल कल्याण संस्थेला भेट देवून दिव्यांगाचे प्रश्न समजून घेतले. पुण्यातील बाल कल्याण संस्था 1983 पासून दिव्यांगासाठी मनोरंजन व संस्कृतिक केंद्र चालवत आहे. रक्षाबंधनाचे औचित्य साधत विभागातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिव्यांगाच्या प्रश्नांची जाणीव व्हावी या हेतूनं संस्थेला भेट दिली. या कार्यक्रमाचे समन्वयन इतिहास विभागातील प्राध्यापक डॉ. गुंजन गरुड आणि डॉ.श्वेता सावले यांनी केले.
सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थी-शिक्षकांनी संस्थेमधील शिबिरार्थी विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधांनाचा सोहळा साजरा केला. इतिहास विभागातील विद्यार्थ्यानी संस्थेच्या अधिकार्यांकडून शिबिरार्थीसाठी चालवले जाणार्या विविध उपक्रमाची माहिती करून घेतली. या उपक्रमांचा भाग म्हणून इतिहासाच्या विद्यार्थ्यानीही दिव्यांगासोबत विविध खेळ, मनोरंजन विषयक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे भाग घेत खाऊ वाटपाचा केला. वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे झाल्याचा आनंद सर्व शिबिरार्थी आणि विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसत होता. बाल कल्याण संस्थेचे संजीव हेबाळे सर यांनी या पद्धतीचे उपक्रम महाविद्यालयीन पातळीवर मोठ्या प्रमाणात घेतले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..