बालेवाडी :
मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेमध्ये 78वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे लक्ष्मणराव महादेव बोराटे सेवानिवृत्त ए.सी.पी. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्री म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालयाच्या विद्यार्थिनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्य गीत तसेच स्फूर्ती गीताचे गायन केले. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन केले.
प्राचार्य श्री दत्तात्रय डफळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रमुख पाहुणे यांनीआपल्या देशाचं नाव जगाच्या पाठीवर पहिल्या क्रमांकावर कसे जाणार यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले.
संस्थेचे सचिव डॉ. सागरदादा बालवडकर यांनी भविष्याची काळजी घेत, वर्तमानाचा विचार करून प्रगती कशी करावी , असे मार्गदर्शन उपस्थितांना केले.
संस्थापक -अध्यक्ष श्री. गणपतराव तथा आप्पासाहेब बालवडकर यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत प्रतिकूल परिस्थितीत कसे, पुढे जाऊन प्रगती करावी याचे मार्गदर्शन केले.
नवचैतन्य हास्य क्लबचे सदस्य श्री दीपक पावसे साहेब यांनी संस्थेचे अध्यक्ष मा. आप्पासाहेब बालवडकर यांच्या जीवनावर आधारित पोवड्याचे गायन केले.सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सर्व विभागांचे प्राचार्य ,विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. चैतन्य हास्य क्लबचे अडवोकेट माशाळकर सर व इतर सदस्य तसेच पालक वर्ग ही मोठ्या संख्येने ही उपस्थित होते.
सुत्रसंचालन सौ.गुंजाळ के. एस.,प्रास्तविक डाॅ. उभे के.पी. आणि आभार प्रदर्शन श्री लोहोकरे एस एस.बी.यांनी केले.
More Stories
बाणेर येथे ज्योती कळमकर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग मार्गदर्शनाचे आयोजन
सोमेश्वरवाडीत चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न..
मतदार नोंदणी अभियान: बाणेरमध्ये लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सौ पुनम विशाल विधाते यांचा पुढाकार..