September 8, 2024

Samrajya Ladha

‘उत्कृष्ठ फिश डिसिज डायग्नोस्टिक लॅब’ या महाराष्ट्र शासानाच्या पुरस्काराने माॅडर्न महाविद्यालय गणेशखिंड सन्मानित

गणेशखिंड :

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयाला महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागातर्फे ‘उत्कृष्ठ फिश डिसिज डायग्नोस्टिक लॅब’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मा डाॅ चंद्रकांत पुलकुंडवार, भारतीय प्रशासन सेवा, मा विभागीय आयुक्त, पुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मत्स्यसंपदा या योजने अंतर्गत ही प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली. यासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने अर्थ सहाय्य दिले आहे.प्रादेशिक पुणे मत्स्य विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे.

 

केंद्र सरकारचे मत्स्य विभागाचे जाईंट कमिशनर आँफ फिशरिज, नवी दिल्ली डाॅ शंकर एल. व विजय शिक्रे, डिव्हिजनल कमिशनर यांनी प्रयोगशाळेला भेट देऊन हि प्रयोगशाळा हि संदर्भ प्रयोगशाळा असुन याचे उदाहरण संपूर्ण देशासाठी आदर्श राहिल असे उद्गागार काढले.

मत्स्य रोग निदान प्रयोगशाळा गेली ३ वर्षे महाविद्यालयामधे चालु आहे. अशी सेवा देणारे हे महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे.

आत्तापर्यंत महाराष्ट्र शासन मत्स्य विभाग,
पुणे विभागातील सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यातील मत्स्य उत्पादक आपल्या महाविद्यालयात येऊन गेले आहेत. पाणी परिक्षण व मत्स्यरोग निदान करण्याचे काम महाविद्यालयाच्या वतीने नाममात्र फी मधे करण्यात येते. यासाठी जे रसायने व साधने वापरली जातात तेवढीच फी घेतली जाते.

मत्स्य रोगाचे अगोदर निदान झाल्यास पुढे होणारे नुकसान टळते.मत्स्य वाढीसाठी आवश्यक असणारे पाण्याचे घटक आणि पर्यावरणीय घटक याचे परिक्षण करण्यासाठी अत्याधुनिक व उत्कृष्ठ दर्जाची उपकरणे प्रयोगशाळेत वापरली जातात.

महाविद्यालयाने मत्स्यरोग निदान यावर एक व “व्हाईट स्पाॅट सिंड्रोम व्हायरस याचा कोळंबीवर होणारा परिणाम व उपाय” या विषयावर शेतकरी व मत्स्य उत्पादक यांची एक अशा दोन कार्यशाळा घेतल्या याशिवाय काॅलेज आँफ मिलिटरी ईंजिनिअरिंग, खडकी यांच्या तलावातील कटला माशांच्या आजाराचे संशोधन करुन त्यांना जीवदान दिले, यासारखे असे अनेक उपक्रम महाविद्यालय सतत घेत असते.

महाविद्यालयातर्फे आवाहन : मत्स्य विषयक कोणताही आजार असल्यास त्याचे निदान, उपचार, कोणताही याविषयक सल्ला व मदत हवी असल्यास महाविद्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी केले आहे.

या सर्व प्रक्रियेत मेघनाथ ईंगोले, संशोधक, डाॅ स्नेहल गागरे शिर्के, डाॅ प्राची क्षीरसागर, डॉ. गायत्री श्रोत्रिय आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी असतात. यामुळे विद्यार्थ्यांना फिल्ड सर्वेक्षण करता येते व त्यांच्या पुढे या व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात असेही प्राचार्य म्हणाले.