पेरिविंकलच्या सूस शाखेत शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक -गुरूंचा सन्मान !!!
सूस :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्यु.कॉलेज च्या सूस शाखेमध्ये आज गुरूवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला .
दरवर्षी ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी वाट दाखविणारे गुरुजनाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस़. सालाबादप्रमाणे यावर्षीही पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या सर्व शाखांमध्ये शिक्षक दिन सोहळा साजरा करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थी गुरूजनांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्सुक होते. विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजन शिक्षकांना पारंपरिक औक्षण करून फुलांच्या पायघड्या घालून शिक्षक व गुरुजनांचे स्वागत केले .
कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती पूजन व सर्वेपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी मान्यवर वेदाचार्य श्री सौरभजी कुलकर्णी, प्रख्यात उद्योजक व नामांकित हस्ती माननीय श्री सुधांशू शर्मा, नांदे गावच्या आदर्श सरपंच निकिता रानवडे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा .श्री.राजेंद्र बांदल सर , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
सरस्वती पूजनानंतर कार्यक्रमाचा प्रारंभ हीच आमची प्रार्थना..या सुमधुर गीताने व विद्यार्थ्याच्या बहारदार नृत्याने करण्यात आली. इयत्ता 12वी तील व 10वी तील विद्यार्थ्यांनी बहारदार पर्फॉर्मेन्स सादर केले. आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुणेरी पगडी घालून पुष्पगुच्छ प्रदान करुन शाळेचे संस्थापक मा बांदल सर यांच्याकडून स्वागत कऱण्यात आले.
इयत्ता ११वी च्या जान्हवी पळसकर हीने शिक्षकांचे महत्व सांगून त्यांच्या मनातील शिक्षकांचे स्थान अढळ केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व गूरूजन- शिक्षकांचा शाळेकडून मुकुट घालून सन्मान करण्यात आला तसेच शाळेचे संस्थापक श्री बांदल सर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकांना विश्वासाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व विद्यार्थी शिष्यांसमोर गूरूजनां च्या हस्ते असा सन्मान मिळणे हाच खरा शिक्षकांचा आदर असे प्रतिपादन करून शिक्षकांचे जीवनातील महत्व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी त्यांच्या भाषणात मनोगत व्यक्त करताना केले.
तर शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करून निशंक मनाने काम केल्यास प्रगतीच होतेच व गुरुबळ म्हणजे काय याची प्रचिती येते तसेच एक शिक्षक राष्ट्रपती होऊ शकतो व राष्ट्रपती पदावरून गेल्यावर सुद्धा एक शिक्षक होऊ शकतो व पुढील अनेक राष्ट्रपती ,इंजिनियर, डॉक्टर घडवू शकतो. अनेक पिढ्या शिक्षक लक्षात ठेवतात येवढी ताकद एका शिक्षकात असते त्यामुळे हे अत्यंत मानाचे प्रतीक असून शिक्षकी पेशा हा केवळ नशीबवान लोकांनाच उपभोगता येतो सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या : राजेंद्र बांदल(संस्थापक/अध्यक्ष चैतन्य विद्या प्रतिष्ठान)
तर आपली संस्कृती जपून शिक्षक दिन शाळेत साजरा करून शाळेचे हे सगळे नयनरम्य कार्यक्रम अनुभवायला मिळाल्याने प्रमुख अतिथी वेदाचार्य माननीय श्री सौरभजी कुलकर्णी सर यांनी सर्वांचे आभार मानले व संस्कृती आणि तंत्रज्ञान याची सांगड घालून पेरीविंकल शाळा इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही संस्कृतीची जोपासना उत्तम प्रकारे करीत आहे व येथील सर्व शिक्षवृंद ही पुढील पिढी घडवण्यासाठी सज्ज आहे असे सांगत सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
भविष्याची पुनर्कल्पना मजबूत आणि टिकाऊ करण्यासाठी पेरीविंकल मधील सगळे शिक्षक सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत व राहतील याची हमी सुधांशू शर्मा यांनी त्यांच्या भाषणाद्वारे दिली.प्रशालेतील सर्व शिक्षकांचा सत्कार तसेच भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येऊन
सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला हे आजकालच्या जगात खूप कमी ठिकाणी बघायला मिळते असे त्यांनी नमूद केले . प्रशालेची सुंदर सजावट व भविष्याची गरज म्हणजे रोबोट बनवण्यात आले होते हे सगळे बघून शिक्षकच येवढे अग्रेसर आहेत तर विद्यार्थी नक्कीच उद्याचे महान व्यक्तिमत्व घेउन उजळतील असे मत व्यक्त करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सांगता पवन करडे यांच्या सुमधुर गीताने करण्यात आली.
संपूर्ण कार्यकमाचे नियोजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल व संस्थापिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित ह्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. पर्यवेक्षक सचिन खोडके व नेहा माळवदे यांच्या समवेत सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थीगण ह्यांच्या सहकार्याने शिक्षक दिनाचा हा कार्यक्रम अतिशय आनंदात उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.
More Stories
बाणेर-बालेवाडी-सुस आणि म्हाळुंगे परिसरातील महिलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित गौरी सजावट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न…
सोमेश्वरवाडी येथे सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
पाषाण येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमोद निम्हण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..