February 12, 2025

Samrajya Ladha

सोमेश्वरवाडी येथे चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीची पर्यावरण पूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न..

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी येथील वसंत दादा पाटील मनपा शाळेत कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीची पर्यावरण पूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने सुबक गणपती मूर्ती बनविण्याचा आनंद उपभोगला.

 

या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने नामदार चंद्रकांत दादा यांच्या माध्यमातून कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मुलांचा उत्साह प्रतिसाद खूप चांगला लाभला : सचिन दळवी (सरचिटणीस, कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ)

यावेळी भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ सरचिटणीस सचिन दळवी, प्रसाद बोकील, गिरीधर राठी, भारत जोरी, ग्रामस्थ महिला, मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग यांच्यासोबत विद्यार्थी उपस्थित होते.

You may have missed