गणेशखिंड :
गणेशखिंड येथिल ,मॉडर्न महाविद्यालय येथे लष्करी रुग्णालयासाठी रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले. सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय AFMC च्या सहकार्याने माॅडर्न महाविद्यालयात सकाळी साडेआठ ते बारा या वेळेत हा रक्तदानाचा कार्यक्रम पार पडला. वैद्यकीय अधिकारी आणि प्रमुख पाहुणे म्हणून मेजर डाॅ अब्बास गाझी नक्वी हे उपस्थित होते. त्यांच्या समवेत सुभेदार श्री प्रदीप कुमार,हवालदार श्री ए.वी नारायण,श्री प्रणाल देखणे(समन्वयक),श्री अरविंद कुमार, श्री इरसाद अली,श्री प्रशांत राठी,श्री असित पात्रा,श्री संजय कुमार, आदि उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य संजय खरात यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाबद्दल जागृत करून रक्तदान करण्यासाठी प्रेरित केले.’रक्तदान ही मानवजातीसाठी सर्वात महत्वाची सामाजिक सेवा आहे, त्यामुळे रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीला मृत्युच्या तोंडातून बाहेर काढू शकतो. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान’असे त्यांनी त्यावेळी सांगितले.
मेजर डाॅ अब्बास गाझी नक्वी यांनी रक्ताची गरज हाॅस्पिटलमधे सतत लागते. ही गरज पूर्ण करण्यासाठी असे कॅम्प सतत घ्यावेत असे सुचवले.
या शिबिरास महाविद्यालयाचे, एनएसएस विभाग प्रमुख प्रा कुमोद सपकाळ, प्रा. गोविंद कांबळे, मल्टीमीडिया प्रमुख व एन एन एस सहाय्यक डाॅ मंजुषा कुलकर्णी,
एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट डाॅ. प्रतिभा राव पाटील, डाॅ. निवेदिता दास, ईनर व्हील क्लब पुणे जेन झी यांचे सहकार्य लाभले.
यावेळी १००पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन चेक झाले. यावेळी ८१ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. महाविद्यालयाच्या एनएसएस आणि एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांचा या शिबिरास उत्स्फूर्त सहभाग होता. तसेच महाविद्यालयाच्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी इतर अनेक विद्यार्थ्यांनी या शिबिरात आपले रक्तदान करून सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला उपप्राचार्य व विभागप्रमुखांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया रेवणवार हिने केले. प्रा सुरेश तोडकर, सहकार्यवाह पी ई सोसायटी व डॉ. प्रकाश दीक्षित, उपकार्यवाह पी ई सोसायटी यांनी अभिनंदन केले.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..