कोथरूड :
महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेच्या अनुषंगाने अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड विधानसभा परिसरात नाव नोंदणी अभियान सुरू केले असून या अभियानाचे औपचारिक उद्घाटन कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते 22 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता आशिष गार्डन, कोथरूड येथे होणार असून पहिल्या टप्प्यात नाव नोंदणी करणाऱ्या २००० लाडक्या बहिणींना साडी भेट दिली जाणार आहे. या अभियानांतर्गत अमोल बालवडकर यांच्या वतीने २५००० महिलांची नावनोंदणी करून या बहिणींना साडी भेट दिली जाणार आहे.
या योजनेच्या अनुषंगाने अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून नाव नोंदणी अभियान सुरू असून या अभियानाच्या अंतर्गत नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येक महिला भगिनींना साडी भेट दिली जात आहे. तरी जास्तीत जास्त महिला भगिनींनी नावनोंदणी करून महाराष्ट्र शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. : माजी नगरसेवक अमोल बालवडकर
कोथरूड मतदारसंघामध्ये शास्त्रीनगर, सुतारदरा आणि कर्वेनगर येथे तसेच बाणेर बालेवाडी मधील अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात नावनोंदणी सुरू आहे. तसेच बालवडकर यांनी तीन फिरत्या मोबाईल व्हॅन द्वारे नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी