November 21, 2024

Samrajya Ladha

७१ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरुष व महिला गटात पुणे ग्रामीण संघाने पटकावले विजेतेपद..

म्हाळुंगे :

कबड्डी दिनाच्या औचित्याने तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ७१ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा व “पुणे लिग कबड्डी स्पर्धा २०२४” चे अतिशय चुरशीचे आणि थरारक अंतिम सामने आज पार पडले. 

७१ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणीमधे यंदा(31 )महिला आणि (31) पुरुष असे एकूण (62) जिल्हा संघ सहभागी झाले या सर्व संघांमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पुरुष गटातून पुणे ग्रामीण (पुणे जिल्हा) संघ स्व. बूवा साळवी चषकाचे तर महिला गटातून पुणे ग्रामीण (पुणे जिल्हा) संघ, यंदाच्या सतेज करंडक २०२४ चषकाचे मानकरी ठरले.

तर पुणे लीग कबड्डी सामन्यासाठी यंदा (12) संघ तयार करण्यात आले. या लीग स्पर्धेत पुरुष गटात शिवनेरी जुन्नर आणि माय मुळशी या दोन्ही तुल्यबळ संघात झालेल्या लढतीत शिवनेरी जुन्नर संघाने पुणे लीग कबड्डी स्पर्धेचे पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले तर पुणे लीग महिला गटात माय मुळशी आणि शिवनेरी जुन्नर यांच्या लढतीमधे  शिवनेरी जुन्नर संघाने पुणे लीग २०२४ महिला गटाचे जेतेपद पटकावले.

७१ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आणि पुणे लीग कबड्डी स्पर्धेचा विजेत्या संघांना युवा नेते मा.पार्थदादा अजितदादा पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. धीरजभैय्या शर्मा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रशांत कदम यासह कबड्डी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

पुणे लीग कबड्डी स्पर्धा २०२४ अंतिम निकाल –

पुरुष विभाग :

१) प्रथम क्रमांक  १५०,०००/- रूपये व सन्मानचिन्ह – शिवनेरी जुन्नर

२) द्वितीय क्रमांक १००,०००/- रुपये व सन्मानचिन्ह – माय मुळशी 

३) तृतीय क्रमांक ७५,०००/- रुपये व सन्मानचिन्ह – बलाढ्य बारामती 

४) चतुर्थ क्रमांक ७५,०००/- रुपये व सन्मानचिन्ह – सिंहगड हवेली

उत्कृष्ट चढाई -१५,०००/-रुपये व सन्मानचिन्ह -आदित्य गोरे (माय मुळशी)

उत्कृष्ट पकड- १५,०००/- रुपये व सन्मानचिन्ह- स्वप्नील कोळी(शिवनेरी जुन्नर)

सर्वोत्कृष्ट खेळाडू – २५,०००/-रुपये व सन्मानचिन्ह- प्रणव बांगर (शिवनेरी जुन्नर)

महिला विभाग :

१) प्रथम क्रमांक  १५०,०००/- रूपये व सन्मानचिन्ह – वेगवान पुणे

२) द्वितीय क्रमांक १००,०००/- रुपये व सन्मानचिन्ह – शिवनेरी जुन्नर 

३) तृतीय क्रमांक ७५,०००/- रुपये व सन्मानचिन्ह – बलाढ्य बारामती 

४) चतुर्थ क्रमांक ७५,०००/- रुपये व सन्मानचिन्ह – सिंहगड हवेली 

उत्कृष्ट चढाई -१५,०००/-रुपये व सन्मानचिन्ह  भारती नरावरे (शिवनेरी जुन्नर)

उत्कृष्ट पकड- १५,०००/- रुपये व सन्मानचिन्ह- सानिका वस्वे (वेगवान पुणे)

सर्वोत्कृष्ट खेळाडू – २५,०००/-रुपये व सन्मानचिन्ह- प्रज्ञा पवार(वेगवान पुणे)

७१ वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा अंतिम निकाल

पुरुष विभाग :

प्रथम क्रमांक – पुणे ग्रामीण, पुणे जिल्हा 

द्वितीय क्रमांक – अहमदनगर 

तृतीय क्रमांक – नंदुरबार 

चतुर्थ क्रमांक – पुणे शहर, पुणे जिल्हा

महिला विभाग :

प्रथम क्रमांक – पुणे ग्रामीण, पुणे जिल्हा

द्वितीय क्रमांक – रत्नागिरी

तृतीय क्रमांक – मुंबई उपनगर(पूर्व)

चतुर्थ क्रमांक – पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा 

७१ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी आणि पुणे लीग कबड्डी स्पर्धेतील विजयी संघाचे खुप खुप अभिनंदन. राज्य अजिंक्यपद निवड चाचणीतून लवकरच राज्याचा संघ तयार केला जाणार असून हा संघ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.