पाषाण :
पुण्यातील डिजिटल कंटेंट क्रिएटर जेरीलन डिसिल्वा यांच्यावर आज बाणेर-पाषाण लिंक रोडवर गाडी चालवत असताना हिंसक हल्ला करण्यात आला. तिने इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये तिचा त्रासदायक अनुभव सांगितला आहे.
बाणेर-पाषाण लिंक रोडवरुन गाडीवरुन महिला तिच्या दोन मुलांसह चालली होती. त्यावेळी हल्ला करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने त्यांना जायला जागा दिली. त्यांनी गाडीदेखील बाजूला केली. मात्र कार चालकाने गाडी थांबवून महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. हल्लेखोराने महिलेच्या नाकावर जोरदार ठोसा मारल्या. त्यानंतर त्यांच्या नाका व तोंडातून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. महिलेवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तिथून निघून गेला. मात्र, इतक्या क्षुल्लक गोष्टीवरुन हल्ला का करण्यात आला हे मात्र, अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाहीये.
हल्ला करणारा व्यक्ती वृद्ध असून तो वेगाने गाडी चालवत होता, असं महिलेने सांगितलं आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसंच, पुणे हे महिलांसाठी आणि नागरिकांसाठी किती सुरक्षित आहे असा सवाल तिनं उपस्थित केला आहे. तसंच, तिने महिला आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली आहे. या महिलेवर सध्या बाणेरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोराने 2 किमीपासून पाठलाग केल्याचा दावा महिलेने केला आहे.
या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस तपास सुरू करण्यात आला आहे. यामध्ये मारहाण करणारा व्यक्ती कोण आहे? त्याने हल्ला का केला हे अद्याप समोर आलेले नाहीये.
https://twitter.com/Dabbu_1010/status/1814601177297752220?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1814601177297752220%7Ctwgr%5E99cb18343c20a956d3f89e740de3cbf511ccff2c%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
More Stories
बाणेर येथे मणिपाल हॉस्पिटलमध्ये मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिर..
बालेवाडी येथे आमदार मेघनाताई बोर्डीकर यांचा मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने जाहीर सत्कार संपन्न झाला..
सुसगाव येथील सुखवाणी पॅनोरमा सोसायटी मधील गणेश मंदिराच्या सभा मंडपाच्या कामाचा शुभारंभ समीर चांदेरे यांच्या हस्ते संपन्न..