September 8, 2024

Samrajya Ladha

आचार्य श्री मंदार यनपुरे स्वामी यांच्या पदस्पर्शाने सुसच्या पेरिविंकलमध्ये गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी !!!

सुस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सुस शाखेमध्ये शनिवार दिनांक 20 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमे चे औचित्य साधून गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.

 

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आचार्य श्री मंदार स्वामी जी यांच्या प्रमुख उपस्थितीत आजची गुरुपोर्णिमा साजरी झाली. कार्यक्रमाचा शुभारंभ हा प्रमुख अतिथी आचार्य श्री मंदार स्वमीजी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ रेखा बांदल व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांच्या हस्ते व्यास पूजन, सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करुन कऱण्यात आला. त्यानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत त्यांच्या नृत्यातून मानवंदना करून केले . व इयत्ता आठवी व नववी विद्यार्थ्यांनी गुरुवंदना व कृतज्ञता त्यांच्या गायन व वादनातून व्यक्त केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुविषयी आदर दर्शविणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त करतानाच कठोर परिश्रम घेऊन यश मिळविण्याची प्रतिज्ञाही घेतली. यावेळी शिक्षिकांनी सर्व विद्यार्थ्यांना गुरु बंधन करून प्रत्येक शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्वामीजी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आचार्य श्री मंदार येनपुरे स्वामी यांनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु या श्लोकाचा अर्थ सांगितला तसेच गुरु शिष्याविषयी असणारे प्रेम याविषयी आणि गुरुपरंपरेचा इतिहास सांगितला.

तसेच संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक श्री राजेंद्र बांदल सर यांनी गुरु शिष्याच्या गोष्टी तसेच त्यांच्या आयुष्यात आलेले गुरूंचे अनुभव व गुरु शिष्य दोन्ही बाजू समजाऊन सांगून मनुष्य हा आजीवन गुरु व शिष्य या दोन्ही भूमिकेत घडत असतो असे प्रतिपादन करुन गुरुचे महत्व स्पष्ट केले. तसेच शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले .

सर्व शिक्षकांनी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशीची गुरुदक्षिणा म्हणून आपल्या गुरु विषयी असणारे प्रेम व आदर हा सुस शाखेची प्रतिकृती (मॉडेल) उभारून त्यातील कुंपण म्हणजे सर्व शिक्षक होय असे सांगून आदर, संयम, patience, knowledge, confidence अशा सर्व गुणांची कायम पाखरण करुन विद्यार्थ्यांची प्रगती हेच ध्येय व हीच गुरुदक्षिणा असे सांगून या सर्व शिक्षक ड्रीम युनिव्हर्सिटी चे मॉडेल उभारून यासाठी सुस शाखेतील सर्व शिक्षक सज्ज असल्याचे आश्वासन दिले तसेच यासाठी शुभेच्छा देऊन युनि्हर्सिटीचे स्वप्न लवकरच पूर्ण करण्याची ग्वाही देउन अखंड सेवेचे आश्वासन समर्पण केले.

आजच्या या संपूर्ण गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर संचालिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने करण्यात आले होते. नेहा माळवदे व सचिन खोडके यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी वर्ग यांच्या मदतीने अत्यंत उत्साहात व आनंदात हा गुरुपौर्णिमा उत्सव शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला व सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्रीन हाऊस कॅप्टन सौ.प्रफुल्ला पाटील यांनी केले.