December 3, 2024

Samrajya Ladha

बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे येथील महिलांसाठी सौ पूनम विधाते यांच्या वतीने ‘मंगळागौर स्पर्धा उत्सव नारीशक्तीचा’ सोहळ्याचे आयोजन..

बाणेर :

बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे येथील माता -भगिनींसाठी वामा वुमन्स क्लबच्या अध्यक्षा पुनम विधाते यांच्या नेतृत्वाखाली ‘मंगळागौर स्पर्धा उत्सव नारीशक्तीचा’ हा सोहळा 11 ऑगस्ट 2024 रविवार, रोजी आपल्या आयोजित करण्यात आला आहे.

रोजच्या संसाराच्या व्यापातून काही क्षण महिलांना आनंद उपभोगता यावा. आपली संस्कृती जपत महिलांमध्ये असलेले सुप्त गुण त्यांना बाहेर काढता यावे म्हणून खास महिलांसाठी सण, संस्कृती आणि परंपरेचा अनोखा संगम! “मंगळागौर स्पर्धा उत्सव नारीशक्तीचा!” हा सोहळा आयोजित केला आहे. जास्तीत जास्त महिला भगिनींनी या स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसांची लयलूट करत आपली संस्कृती जोपासण्यासाठी सहकार्य करावे : सौ. पूनम विशाल विधाते (अध्यक्ष वामा वुमन्स क्लब)

“मंगळागौर स्पर्धा उत्सव नारीशक्तीचा!” या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता https://forms.gle/GSsVoriqwiZTdR187 या लिंक वर जाऊन आपला सहभाग नोंदवावा.

स्पर्धेचा दिनांक : ११ऑगस्ट २०२४
सर्व महिला स्पर्धकांसाठी मोफत सहभाग!
प्रथम पारितोषिक : ३१०००/-
द्वितीय पारितोषिक : २१०००/-
तृतीय पारितोषिक : ११०००/-
उत्तेजनार्थ : ५१००/-
श्रावण क्वीन : १ नथ
सर्वात्कृष्ट वेशभुषा : चांदीची जोडवी
सर्वात्कृष्ट निवेदिका : पैठणी
प्रत्येक सहभागी महिलेसाठी आकर्षक भेटवस्तू
अधिक माहितीसाठी संपर्क : 9607454500