September 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

छोट्या छोट्या उद्योगातून आपलं अस्तित्व तयार करावं म्हणून वामा वूमन्स क्लब च्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन : सौ. पूनम विशाल विधाते.

सुस येथे “द आर्ट ऑफ बेकिंग” कार्यशाळेस मोठा प्रतिसाद.

सुस :

वामा वुमन्स क्लबच्या अंतर्गत पूनम विशाल विधाते यांच्या वतीने खास सुस येथील सर्व माता-भगिनींसाठी मोफत “द आर्ट ऑफ बेकिंग” ही केक आणि कुकीज बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली.

घरगुती व्यवसायातून अनेक उद्योजिका घडलेल्या आपण पहिल्या आहेत. महिलांनी सक्षम व्हावं, स्वावलंबी बनून छोट्या छोट्या उद्योगातून आपलं अस्तित्व तयार करावं म्हणून वामा वूमेन्स क्लब च्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन दिलं जातं. बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे व्यतिरिक्त संपूर्ण पुण्यातूनच वामा च्या इव्हेंट्स ला मोठा प्रतिसाद मिळतो. महिलांचा उत्साह व नवनवीन प्रशिक्षण घेत पुढे जाण्याची जिद्द बघून आम्हालाही विविध कार्यक्रमांसाठी प्रेरणा मिळते : सौ. पूनम विशाल विधाते (अध्यक्ष वामा वुमन्स क्लब)

आज सुस येथे बेकिंग कार्यशाळा पार पडली. ७० पेक्षा जास्त महिलांनी या कार्यशाळेत सहभाग घेत बेकिंग चा आनंद घेतला.

 

You may have missed