November 21, 2024

Samrajya Ladha

गुरु-बंधन उपक्रम राबवून पेरिविंकल स्कूलने जपली गुरू-शिष्य परंपरा.

बावधन :

गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या बावधन व पिरंगुट येथे गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात व्यास मुनींच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करुन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल, संचालिका सौ रेखा बांदल, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक श्री धोंडीबा कुंभार यांच्या हस्ते करण्यात आली.

गुरुपौर्णिमेच्या पावनपर्वावर एकलव्य, गुरु द्रोणाचार्य यांची कथा विद्यार्थ्यांनी नृत्यातून सादर केली. तसेच गुरुचे विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्त्व पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुविषयी आदर दर्शविणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त करतानाच कठोर परिश्रम घेऊन यश मिळविण्याची प्रतिज्ञाही घेतली. यावेळी शिक्षिकांनी सर्व विद्यार्थ्यांना गुरु बंधन करून प्रत्येक शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कुंभार सर यांनी त्यांच्या 40 वर्षाच्या शैक्षणिक जीवनात आलेले अनुभव विद्यार्थ्यांसमोर प्रगट केले.
तसेच चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ. रेखा बांदल यांनी गुरू व शिष्य यांचे नाते स्वच्छ व निर्मळ आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवून समाजात वागायला पाहिजे, असे मत व्यक्त केले. आधुनिक गुरू व शिष्य यांची माहिती पटवून देताना गुरू व शिष्य यांचे आजचे बदलेले समाजातील स्थान याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ.प्रिया लढ्ढा, श्री अभिजीत टकले, पर्यवेक्षिका इंदू पाटील, कल्याणी शेळके, पूनम पांढरे, सना इनामदार व समस्त शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.