September 17, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथील मुरकुटे विधाते वस्ती येथे सौ पुनम विधाते यांच्या प्रयत्नामुळे पाणी प्रश्न दूर करण्यासाठी वॉल दुरुस्ती कामास सुरुवात…

बाणेर :

बाणेर येथील मुरकुटे विधाते वस्ती येथे पल्लोड फार्म येथे वॉल खराब झाल्याने मागील चार पाच दिवसांपासून पाण्याची अडचण निर्माण झालेली लक्षात येताच ऐन सणासुदीच्या काळात पाणी प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला कार्याध्यक्ष पूनम विधाते क्षेत्रीय कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत वॉल दुरुस्ती कामास सुरुवात करायला लावत स्वतः उभे राहून पाण्याची समस्या ऐन सणासुदीच्या काळात गंभीर होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहे.

सणासुदीचे दिवस सुरु झाले कि सर्वत्र नातेवाईक, मित्रपरिवार, पूजा, प्रसाद याने सर्व कुटुंब भरून जाते. अशा आनंदाच्या वातावरणात पाण्याचा प्रश्न उद्भवला तर सर्वच अवघड होते. घरच्या गृहिणींबरोबर सर्वानाच हा त्रास होतो. आज माझ्या मुरकुटे विधाते वस्ती भागामध्ये गेले चार ते पाच दिवस झालं पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. ऐन सणाच्या काळात महिलांना पाणीप्रश्नाला सामोरे जायला नको म्हणून अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पल्लोड फार्म येथील खराब झालेला वॉल आज दुरुस्त करण्यात येत आहे. त्यामुळे स्वतः हजर राहून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. लवकरच मुरकुटे विधाते वस्तीतील प्रश्न सुटेल अशी आशा आहे – सौ. पूनम विशाल विधाते(कार्याध्यक्ष : पुणे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस/ अध्यक्ष : वामा वुमेन्स क्लब)

ऐन सणासुदीच्या काळात पामुख्याने महिलांना तसेच सर्वच कुटुंबांना पाण्याची अडचण भासू नये म्हणून मोठ्या तळमळीने सौ पुनम विधाते यांनी पाण्याची अडचण वाढू नये म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत.