December 18, 2024

Samrajya Ladha

बाणेर-बालेवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरातील सोसायट्यांसाठी प्रथमच आयोजीत सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेला सुरुवात…

बाणेर :

बाणेर-बालेवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरात प्रथमच राहुल बालवडकर (उपाध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पुणे शहर) व समिर चांदेरे (अध्यक्ष-राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष,पुणे शहर) यांच्या वतीने यंदा प्रथमच प्रभागातील सोसायट्यांसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली याचा शुभारंभ माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

 

बालेवाडी येथील कुणाल एक्सपायर सोसायटी व बाणेर येथील व्हेनेजिया सोसायटी येथून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला आहे. बाणेर, बालेवाडी, सुस आणि म्हाळुंगे भागातील २५०-३०० सोसायट्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

१२ ऑगस्ट पर्यंत पहिल्या वहिल्या सोसायटी अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी झालेल्या सोसायट्यांचा गणरायाच्या सजावटीचे परीक्षण होणार आहे. या स्पर्धेमुळे सोसायटी नागरिकांची कल्पकता समोर येणार असून स्पर्धा अधिक रंगतदार होईल.