November 21, 2024

Samrajya Ladha

एफ पी ए इंडियाच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन, वर्षभरात एक लाख तरुण महिलांचा कॅन्सर पासून बचाव करण्याचे प्रयत्न केला जाणार..

पुणे :

दिनांक 18 जुलै रोजी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या गोरान ग्रासकोफ फॅमिली क्लिनिक मार्फत पत्रकार भवन पुणे येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती सदर परिषदेसाठी संस्थेच्या अध्यक्षा फ्रेणी तारापोर आणि उपाध्यक्ष गीतांजली देशपांडे उपस्थित होत्या उपाध्यक्ष गीतांजली देशपांडे यांनी संस्थेच्या कार्याविषयी व देण्यात येणाऱ्या सेवांविषयी तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची भारतातील सद्यस्थिती आणि आजाराची गंभीरता याबद्दल माहिती दिली अध्यक्ष फ्रेणी तारापोर यांनी संस्थेचा इतिहास व कुटुंब नियोजनाचे महत्त्व आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया चे कार्य याबद्दल माहिती दिली.

एफ पी ए इंडियाच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर भर दिला जाणार आहे त्यासाठी पूर्ण भारतामधील एफ पी ए आय इंडियाच्या विविध शाखा आणि प्रकल्पा मार्फत गर्भाशयामुखाच्या कॅन्सरसाठी जनजागृती तपासणी आणि HPV लसीकरण केले जाणार आहे आणि या सर्व माध्यमातून वर्षभरात एक लाख तरुण महिलांचा कॅन्सर पासून बचाव करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी दहा ते एक या वेळेत गर्भाशयमुखाचा कर्करोग एचपीव्ही लसीकरण आणि त्याबद्दलचे गैरसमज तसेच या कर्करोगामुळे कुटुंबावर आणि समाजावर होणारे परिणाम स्त्री व पुरुषांचे लैंगिक व प्रजनन आरोग्य आणि अधिकार तज्ञ मार्ग याबद्दल तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.