November 21, 2024

Samrajya Ladha

औंध आयटीआय येथे’मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची’ प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आढावा बैठक संपन्न..

औंध :

दि. २१जूलै २०२४ रोजी शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे येथील सुसंवाद कक्षात ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची’ प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, सदर बैठकीस मंगल प्रभात लोढा(मंत्री कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य) यांच्या बरोबर त्यांचे ओएसडी मा श्री ऋषिकेश हुंबे या योजनेचे नोडल ऑफिसर म्हणून उपस्थित होते, तसेच पुणे विभागाचे सहसंचालक मा श्री रमाकांत भावसार, पुणे जिल्ह्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, अधिकारी मा श्री उदयशंकर सुर्यवंशी, आणि पुणे जिल्ह्यातील सर्व संस्था प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची’ अंमलबजावणी कशी करावी, या योजनेचा उद्देश काय आहे, हि योजना कोणासाठी आहे, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो,या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याची नोंदणी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता या संकेत स्थळावर करणेबाबत किंवा इतर संस्थेच्या मार्फत करता येईल का आणि सदर योजनेची अंमलबजावणी कधी पासून करता येईल याबाबत मंत्री महोदयांनी उपस्थित अधिकार्यांना मार्गदर्शन व सुचना देताना उपस्थिताकडून योजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने सुचना देखील समजून घेतले. या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील दरवर्षी दहा लाख उमेदवार घेतील असा विश्वास मंत्री महोदयांनी व्यक्त केले. शासकीय/ निमशासकीय, खाजगी आस्थापना योजनेत सहभागी असतील.

या योजनेचे तपशीलवार माहिती शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे, त्याचे अवलोकन करावे असे पुणे विभागाचे सहसंचालक मा श्री रमाकांत भावसार नमूद केले. उदयशंकर सुर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.