May 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल बालवडकर यांच्या वतीने कोथरूड मतदारसंघातील माझी लाडकी बहीण योजनेची नावनोंदणी केलेल्या २,५०० महिलांसाठी मेळाव्याचा शुभारंभ

नाव नोंदणी केलेल्या प्रत्येक बहिणीला आकर्षक साडी भेट 

कोथरुड :

आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड मतदारसंघातील शास्त्रीनगर, सुतारदरा आणि कर्वेनगर परिसरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नावनोंदणी केलेल्या २,५०० महिलांसाठी मेळावा घेण्यात आला.

 

तसेच नाव नोंदणी अभियानांतर्गत कोथरूड मतदारसंघातील या परिसरांमध्ये ज्या महिलांनी सदरील योजनेंतर्गत नावनोंदणी केली आहे, त्या सर्व महिलांना अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने आज आशिष गार्डन, कोथरूड येथे आकर्षक साडी भेट म्हणून देण्यात आली. माता भगिनींना साड्यांचे वाटप यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, मा. नगरसेवक श्री. किरण दगडे पाटील, अमोल बालवडकर फाउंडेशन चे सभासद व इतर मान्यवर आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.