April 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

म्हाळुंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलात होणार ७१ वी पुरुष व महिला वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा..

सतेज संघ, बाणेर आणि बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन चे आयोजन

पुणे :

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने व सतेज संघ, बाणेर आणि बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन आयोजित ७१ वी वरिष्ठ गट पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२४” हि स्पर्धा सोमवार दि. १५ जुलै ते शनिवार दि. २० जुलै २०२४ या कालावधी मध्ये म्हाळुंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुल बॅटमिंटन हॉल येथे संपन्न होणार आहे.

 

स्पर्धेसंदर्भातील पत्रकार परिषद आज पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे यांनी स्पर्धेची माहिती दिली.

याप्रसंगी श्रीमती शकुंतला खटावकर (अर्जुन पुरस्कार खेळाडु), श्री दत्तात्रय झिंजुर्डे (सरकार्यवाह-पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन), नासिर सय्यद (अध्यक्ष-सतेज संघ),श्री अर्जुन शिंदे (मा.अध्यक्ष-सतेज संघ), श्री माणिक गांधीले (सचिव-सतेज संघ), श्री समिर चांदेरे (अध्यक्ष-राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर), श्री शरद चव्हाण (सदस्य-नियोजन समिती), सौ.संगिता सोनवणे (उपाध्यक्ष-पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन),
श्री प्रकाश पवार (खजिनदार-पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन), श्री राजेश ढमढेरे (सहकार्यवाहक-पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन), श्री हनुमंत पवार (सहकार्यवाहक-पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन), श्री संदिप पायगुडे (सहकार्यवाहक-पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन), इम्रान शेख (अध्यक्ष-पंच मंडळ), श्री सुनिल मोरे, श्री प्रविण पासलकर, श्री सागर खळदकर, सलमा शेख व पत्रकार उपस्थित होते.

 

You may have missed