July 17, 2024

Samrajya Ladha

सचिन मानवतकर सोशल फाउंडेशनच्या वतीने १० वी व १२ वी च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार..

कस्तुरबा वसाहत :

१० वी व १२ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे आयुष्याच्या आशा टप्यावर उभे आहेत, जिथे त्याना त्यांचे भविष्य घडविण्यासाठी मार्गदर्शन तर गरजेचे आहेच पण त्याहुन जास्त वर्षभर आभ्यास करण्यासाठी काही साहित्य देखील गरजेच आहे. याच गोष्ठीची जान ठेऊन, प्रत्येक वर्षी न चुकता हा सामाजिक उपक्रम श्री सचिन मानवतकर सोशल फ़ाऊंडेशन तर्फे घेण्यात येतो.

या वेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी सचिन मानवतकर यांनी सामाजिक काम करत असताना समाजाप्रती आस्ता व आपुलकी जपत सामाजिक व प्रामाणिक भावनेतुनच प्रतिवर्षी वस्ती भागातिल गरीब विद्यार्थी साठी विशेष सामाजिक उपक्रम राबविले त्याबद्दल त्यांचे कौतुक करत माझ्या शुभेच्छा कायम त्यांच्या सोबत आहेत आणि राहतील अशा भावना व्यक्त केल्या.

या वेळी मा. नगरसेवक सनी निम्हण यांनी देखील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सचिन मानवतकर यांची पुर्ण जडघडन वस्ती भागामध्ये झालेली असल्या मुळे, त्यांना वस्तीभागतील विद्यार्थींना शिक्षण घेत असताना काय काय अडचनींना सामोरे जाव लागत याची जान आहे. म्हणूनच ते हा उपक्रम नेहमी राबवतात. त्यांनी समाज्यासाठी असेच भविष्यात देखील समाजकार्य करावे.

या वेळी मा.आमदार सिध्दार्थ शिरोळे, मा.नगरसेवक सनी निम्हण, भाजपा छ.शिवजी नगर अध्यक्ष- गणेश बगाडे, सचिन मानवतकर, श्री मिटुशेठ घडसिंग, श्री काका गरबडे, श्री विकास लोंढे, श्री सुरज गायकवाड़, श्री प्रमोद कांबळे, सौ. मिनाताई गायकवाड, सौ.कुंभारताई. सौ.वनमालाताई कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.