May 20, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बावधन येथे ३५.३७ ग्रुपच्या माध्यमातून वाहतूक विभागातील पोलिस बांधवांना पावसाळी रेनकोट चे वाटप..

बावधन :

बावधन येथील ३५.३७ ग्रुपच्या माध्यमातून ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शिवभक्त युवराज राठोड यांच्या वतीने बावधन येथील वाहतूक विभागातील पोलिस बांधवांना पावसाळी रेनकोट चे वाटप करण्यात आले.

 

वाहतूक पोलिस भर पावसात रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळित करण्यासाठी मोलाचे काम करत असतात म्हणुनच त्यांना पावसाळी रेनकोट वाटप करत त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यात आला.

यावेळी अमित सणस, संदीप झोटे, अनिल बुरूंगले, भगत मोहिते, चिराग पोटे, यशवंत झोरे उपस्थित होते.