बाणेर :
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दैनिक सकाळचे पत्रकार बाबा तारे यांना यंदाचा ‘मुळशीरत्न आदर्श पत्रकार’ पुरस्कार जाहीर झाला आहे. डिफेन्स मल्टीस्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर, हिंजवडी यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी ‘मुळशीरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
यावर्षी पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची दखल घेत बाबा तारे यांना हा सन्मान देण्यात येणार असल्याची माहिती डिफेन्स मल्टीस्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटरचे संस्थापक अध्यक्ष नितीन काकडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
बाबा तारे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, पर्यावरण, राजकीय तसेच विविध सार्वजनिक प्रश्नांवर सातत्याने लेखन करत जनतेच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत यापूर्वीही त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
हिंजवडी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात गुरुवार, १३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती नितीन काकडे यांनी दिली.
या पुरस्काराच्या घोषणेनंतर विविध स्तरांतून बाबा तारे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!