बालेवाडी :
बालेवाडी येथील Expert Super-Speciality Clinic तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष Health Awareness Week आयोजित करण्यात आला आहे. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे आणि वेळेत तपासणी करण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या विशेष आरोग्य आठवड्यात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये
डॉ. प्रसाद भाटे (पोट व लिव्हर विकार तज्ञ),
डॉ. अक्षय काशीद (हृदय रोग तज्ञ)
आणि डॉ. चिन्मय कुंभार (मेंदू रोग तज्ञ – Neurologist)
यांची सेवा रुग्णांना मिळणार आहे.
या आठवड्यात हृदय, लिव्हर व मेंदूशी संबंधित अनेक महत्त्वाच्या तपासण्या सवलतीच्या दरात किंवा मोफत करण्यात येणार आहेत. हृदय तपासणी अंतर्गत ECG पूर्णपणे मोफत असून 2-D Echo वर 70 टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच लिव्हर तपासणीसाठी Advanced Liver Test – FibroScan वर 50 टक्के सूट उपलब्ध आहे.
याशिवाय मेंदू व स्ट्रोक प्रतिबंध तपासणी अंतर्गत Stroke Risk Assessment तसेच Diabetic Neuropathy Screening – Bioesthesiometer Test मोफत करण्यात येणार आहे.
रक्त तपासण्यांमध्ये Serum Homocysteine, HbA1c, Lipid Profile, Blood Pressure (BP), BMI आणि Random Blood Sugar या तपासण्यांवर 50 टक्के सूट देण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या Homocysteine level जास्त आढळतील अशा रुग्णांना B12 Injection मोफत देण्यात येणार आहे.
सर्व तपासण्यानंतर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत counselling आणि consultation देखील उपलब्ध राहणार आहे.
हा आरोग्य उपक्रम लक्ष्मी माता मंदिराजवळ, V Business Center, तिसरा मजला, बालेवाडी येथील Expert SuperSpeciality Clinic येथे आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेत वेळेत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अपॉइंटमेंटसाठी संपर्क:
शरद माळी – 9011253443.


More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने महिला नगरसेविका, संचालिका व कर्मचार्यांचा सन्मान…..
पत्रकार बाबा तारे यांना ‘मुळशीरत्न आदर्श पत्रकार’ पुरस्कार जाहीर
सूस शाखेच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महिला दिनानिमित्त विविधतेतील एकतेचा सुंदर आविष्कार!!!!