बाणेर :
योगीराज पतसंस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेतील महिला संचालिका व कर्मचार्यांचा नगरसेविका रोहिणी चिमटे, मयुरी कोकाटे, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर यांच्या शुभहस्ते भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच महिला सभासदाला कर्ज वितरण करण्यात आले. नवनिर्वाचित महिला नगरसेविकांचाही संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, संस्थेत 50% पेक्षा जास्त महिला कर्मचारी आहेत व संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. संस्थेत नेहमीच आम्ही महिलांना सन्मानाची वागणूक देत असतो परंतू महिला दिनानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान कर्तुत्ववान महिलांच्या शुभहस्ते दरवर्षी करण्यात येतो.
याप्रसंगी शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, संचालिका रंजना कोलते, सहयोगी संचालिका निकिता माताडे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे तसेच सर्व कर्मचारी व खातेदार उपस्थित होते.
संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी