पुणे, 8 मार्च 2026:
युवा सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित “सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सवाअंतर्गत तिसऱ्या पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकाल स्पर्धेत 21किमी पुरुष गटात साहिल सागरने, तर महिला गटात साक्षी जड्याल हिने, तर, 10किमी पुरुष गटात निखिल सहानी याने, महिला गटात रविना गायकवाड यांनी विजेतेपद संपादन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल १७ हजार धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला होता.पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक संघटनेच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेत २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी अशा चार गटांमध्ये धावपटू आपले कौशल्य पणाला लावले.
स्पर्धेत 21किमी पुरुष गटात साहिल सागरने 01.04.34 सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, केनियाच्या जॉन म्यूइनडे(01.05.21से) व देइझी इंडल्यू(01.05.27से) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. याच महिला गटात साक्षी जड्याल हिने 01.22.29 सेकंद वेळ नोंदवत विजेतपदाचा मान पटकावला. तर, गायत्री पाटील(01.23.12से) हिने दुसरे आणि अश्विनी जाधव(01.23.23से) हिने तिसरे स्थान पटकावले.
10किमी पुरुष गटात निखिल सहानी याने 31.33सेकंद वेळ नोंदवत विजेतेपदाला गवसणी घातली. तर, महिला गटात रविना गायकवाड हिने 35.56 सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेवक सनी निम्हण, सोमेश्वर फाउंडेशनच्या सचिव व माजी नगरसेविका स्वाती निम्हण, सोमेश्वर फाउंडेशनच्या संचालिका मधुरा निम्हण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तांत्रिक नियोजन यश रायकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले, “या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून पुणेकरांमध्ये क्रीडा संस्कृती वाढवणे, निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे आणि युवकांना सकारात्मक दिशेने, नशा मुक्तीसाठी प्रेरित करणे हा आमचा उद्देश आहे. पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉनमध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू बरोबरच तब्बल 17 हजार धावपटूंनी उत्साहाने सहभाग नोंदवला, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. ‘रन फॉर अमृतकाल’ या संकल्पनेतून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निरोगी आणि सशक्त समाज घडवण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.”
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “पुणे शहर नेहमीच क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडीवर राहिले आहे. अशा प्रकारच्या मोठ्या मॅरेथॉन स्पर्धांमुळे नागरिकांमध्ये फिटनेसबाबत जागरूकता वाढते आणि युवा पिढीला प्रेरणा मिळते. सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित ‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सव हा निश्चितच पुण्यातील क्रीडा चळवळीला बळ देणारा उपक्रम आहे.”
निकाल: प्रथम, द्वितीय व तृतीय यानुसार:
21किमी पुरुष गट:
1. साहिल सागर(01.04.34से), 2. जॉन म्यूइनडे(01.05.21से), 3. देइझी इंडल्यू(01.05.27से);
21किमी महिला गट:
1. साक्षी जड्याल(01.22.29से), 2. गायत्री पाटील(01.23.12से), 3. अश्विनी जाधव(01.23.23से);
10किमी पुरुष गट:
1. निखिल सहानी(31.33से), 2. ईश्वर जिरवाल(31.55से), 3. सौरभ(32.47से);
10किमी महिला गट:
1. रविना गायकवाड(35.56से), 2. साक्षी भंडारी(36.17से), 3. मुस्कान कुशवाह(36.31से).



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी