December 3, 2024

Samrajya Ladha

औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने पालखी सोहळा निमित्त हॅरिस पुलापासून ते खडकी स्टेशन पर्यंत स्वच्छ्ता मोहिम..

औंध :

दिनांक 30 जून रोजी जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी बोपोडी येथून पुण्य नगरीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानिमित्त औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने हॅरिस पुलापासून ते खडकी स्टेशन पर्यंत डिप क्लिनिंग द्वारे रस्त्याची स्वच्छता, रादारोडा माती उचलणे, फुटपाथ व डिव्हायडर मधील गवत काढणे, रस्त्यावरील खड्डे बुजवून डागडुजी करण्याचे कामकाज करण्यात आले.

सदर कामकाज मा. श्री. संदिप कदम (उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन), मा. श्री. गणेश सोनुणे (उप आयुक्त परिमंडळ क्र. 2), मा. श्री. गिरीष दापकेकर (महा. सहाय्यक आयुक्त औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालंय) यांच्या आदेशानुसार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. विजय भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे.